Duration 1:2

रत्नागिरी,पुणे,परभणी,जळगाव संस्कृत विद्यापीठाचं उपक्रेंद सुरू करण्यात येत असल्याची घोषणा-उदय सामंत

784 watched
0
5
Published 28 Aug 2021

२८.०८.२०२१ : संस्कृतचा प्रसार व्हावा यासाठी यावर्षीपासून रत्नागिरी, पुणे, परभणी, जळगाव इथं संस्कृत विद्यापीठाचं उपक्रेंद सुरू करण्यात येत असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभाग आणि रामटेकचं कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. गणपतीपुळे इथं गुरुकुल व्यवस्था सुरू करण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं. ज्या भाषेने देश घडवला, त्या संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असं सामंत म्हणाले. यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रा. डॉ. मधुसुदन पेन्ना यांच्यासह संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, आणि संस्कृत भाषा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य सरकारतर्फे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारानं गौरविण्यात आले. कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने,खासदार विकास महात्मे, शिक्षक आमदार अभिजीत वंजारी, आमदार आशीष जयस्वाल उपस्थित होते.

Category

Show more

Comments - 0